मोनिका गजेंद्रगडकर यांच्या या कथासंग्रहातील बहुतेक कथानुभवांत वेगवेगळ्या स्तरांतील माणसांच्या जगण्यातील विकलता समोरी येते. कधी धर्मावरील आत्यंतिक ‘श्रद्धे’मुळे, कधी भौगोलिक अंतरांमुळे, कधी माणसाला माणूस न समजल्यामुळे, कधी कलावंतांच्या मनस्वीपणाच्या आंतरिक तीव्र पिळांमुळे... ही विकलता माणसांना- त्यांच्यातल्या नात्यांना, स्त्री-पुरुष संबंधांना- त्यांच्या पूर्ण आयुष्यालाच आर्त करून टाकते. कथानुभवांचे अंत:पदर सूचक, संयत आणि अकृत्रिम शैलीतून उलगडत जाताना संगीतातल्या आर्त स्वरांसारखे ते व्याकूळ करत राहतात. ही व्याकुळता हाच या कथांचा गाभा आणि त्यांचे सौंदर्यही.
please login to review product
no review added